जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर   

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) केंद्र सरकारला मार्च महिन्यात १.९६ लाख कोटी मिळाले. आतापर्यंतचे हे दुसर्‍या क्रमांकाचे संकलन आहे. मागील वर्षी याच कालावधीत जीएसटी संकलन १.७६ लाख कोटी इतके होते.
 
यंदा फेब्रुवारीच्या तुलनेत जीएसटी संकलन ९.९ टक्क्यांनी वाढले. देशांतर्गत व्यवहारातून जीएसटी संकलन ८.८ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटींवर पोहोचले. तर, आयात केलेल्या वस्तूंवरील महसूल १३.५६ टक्क्यांनी वाढून  ४६,९१९ कोटींवर पोहोचले, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. एकूण जीसीटीमध्ये केंद्रीय जीएसटी ३८,१४५ कोटी, राज्य जीएसटी ४९,८९१ कोटी, एकात्मिक जीएसटी ९५,८५३ कोटी आणि उपकर अंतर्गत १२,२५३ कोटी मिळाले.
 
एप्रिल २०२४ मध्ये २.१० लाख कोटी विक्रमी जीएसटी महसूल केंद्र सरकारला मिळाला होता. त्यानंतरचे, हे दुसर्‍या क्रमांकाचे जीएसटी संकलन आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२३ या कालावधीतील एकूण जीएसटी संकलन २२.०८ लाख कोटी आहे. महाराष्ट्र, हरयाना, उत्तर प्रदेश आणि राजस्तानमधील जीएसटीमध्ये १० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर,  गुुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील जीएसटी संकलनात ७ टक्के वाढ झाली.

Related Articles