व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात   

मुंबई : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे, १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर राजधानी दिल्लीत आता १,७६२ रुपयांना मिळणार आहे. दरवाढ मंगळवारपासूनच लागू झाली आहे.
 
मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७१४.५० रुपये झाली आहे. पूर्वी, मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी १७५५.५० रुपये मोजावे लागत होते.चेन्नईत आता व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत १,९२४ रुपये झाली आहे. पूर्वी, ती १,९६५ रुपये होती.कोलकातामध्ये आता १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १८७२ रुपयांना उपलब्ध होईल. पूर्वी, तो १,९१३ रुपयांना मिळत असे.व्यावसायिक सिलिंडरच्या दरात बदल झाला असला तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च २०२४ मध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात अखेची कपात करण्यात आली होती. तर, मागील महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

Related Articles