E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
६ ठिकाणी आगी; ६ लाखांवर ग्राहकांना फटका
पुणे
: वाढलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्याचा वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली ऊस, गवत व कचरा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या महिन्याभरात आगीमुळे महापारेषण व महावितरण यंत्रणेत सहा ठिकाणी बिघाड झाल्यामुळे तब्बल ६ लाख २३ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. महावितरणला देखील वीजविक्रीमध्ये नुकसान सहन करावे लागले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील विजेचे उपकेंद्र, शेती तसेच सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा वीजतारांखाली ऊस, गवत किंवा कचर्याच्या ढिगारा पेटवल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजतारांखाली कचरा टाकू नये तसेच ढिगारा जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
२३ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत गवत, ऊस व जंगलातील वणवासदृश्य आगीचे तब्बल पाच प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने चाकण, भोसरी व हिंजवडी फेज १ ते ३ मधील सर्व लहानमोठे उद्योग तसेच पिंपरी चिंचवड शहर, वाकड, भोसरी गाव आदींसह मुळशी तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे ५ लाख ९६ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना दोन ते तीन वेळा प्रत्येकी ४५ ते ६० मिनिटे खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले आहे. तर पुणे शहरातील नवले ब्रीज ओढ्याजवळ टाकलेल्या कचर्यांच्या ढिगार्याला आग लागल्याने महावितरणच्या अमित उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी जळाली. परिणामी २७ हजार वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या आगीच्या सर्व प्रकारांत महावितरणचे देखील वीजविक्रीमध्ये नुकसान झाले.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी साठवलेला कचरा जाळू नये. कचरा, वाढलेले तण, गवत, उसाच्या आगीमुळे प्रामुख्याने वीजवाहिन्यांमध्ये ट्रिपिंग आल्याने वीजपुरवठा खंडित होतो. वीजयंत्रणेला जवळच्या आगीमुळे धोका असल्याचे लक्षात येताच २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२/ १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Related
Articles
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा
01 Apr 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा
01 Apr 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा
01 Apr 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा
01 Apr 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात