भारतीय वारकरी मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण   

पुणे : भारतीय वारकरी मंडळ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संत विचार जनमानसात व्यापक प्रमाणावर घडविण्याच्या हेतूने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्त भारतीय वारकरी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
यावेळी भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष धनंजय बडदे, उपाध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश तुरे, विणेकरी संदीप सपकाळ, कार्यवाह अखिल झांजले, सह कार्यवाह सुभाष साळुंखे, महेश नरळे, केदार कवडे व हिशोब तपासणी रवींद्र भरम तसेच कार्यकारणी सदस्य सूर्यकांत दगडे, धनंजय वसवे, नितीन निम्हण, दिनेश लखेरी, राजेश वांजपे,  सौरभ करडे,  प्रथमेश कावनकर उपस्थित होते.
 
भारतीय वारकरी मंडळातर्फे अडीच महिने पुणे शहरातील विविध विठ्ठल मंदिरे, गणपती मंदिरे, देवीची मंदिरे, मारुती मंदिरे आशा वेगवेगळ्या मंदिरामध्ये वासंतीक उटी भजनाचे आयोजन केले आहे. भारतीय वारकरी मंडळामध्ये सुमारे ८० भजनी मंडळे सभासद आहेत. प्रत्येक मंडळाला स्वतःचा पूर्व इतिहास असून आजदेखील मंदिरांमध्ये नित्याने भजने केली जातात. मंडळाच्या कीर्तन महोत्सव, दिंडी सोहळा, पारायणे, प्रवचने अशा धार्मिक उपक्रमांचे आयोजन तसेच समाजातील विशेषतः तरूण पिढीमध्ये ‘भक्तीशक्ती’ संस्काराच्या माध्यमातून प्रगल्भ कार्यसंस्कृती व ज्ञानसंपादनाची प्रवृत्ती रुजावी यासाठी संतपर व वारकरी संप्रदायाशी निगडित प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्रे, संस्कार शिबिरे, व्याख्यानमाला अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा घेण्यात येणार आहेत.

Related Articles