पंजाबचा ८ फलंदाज राखुन विजय   

लखनऊ : पंजाबविरुद्ध लखनऊ यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने ८ फलंदाज राखुन बलाढ्य विजय मिळविला. पंजाबच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला वर्चस्व मिळविता आले.  गोलंदाज अर्शदीप सिंग याने ३ फलंदाज बाद केले तर लॉकी फर्ग्युसन, मॅक्सवेल, मॅक्रो जॅनसन आणि चहल यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. पंजाबच्या संघाला मिळालेले १७२ धावांचे आव्हान पार करताना पंजाबच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली यामध्ये प्रभासिमरनसिंग याने ६९ धावा करत शानदार अर्धशतक केले. तर त्याला साथ देताना श्रेयस अय्यर याने ५२ धावा करत दुसरे अर्धशतक केले. 
प्रियांश आर्या हा ८ धावांवर बाद झाला, त्याला दिग्वेश राठी याने शानदार गोलंदाजी करत ठाकूर याच्याकडे त्याला झेलबाद केले. नीहाल वाद्रा याने नाबाद ४३ धावा केल्या. तर अवांतर ५ धावा पंजाबच्या संघाला मिळाल्या.  
 
त्याआधी लखनऊच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७१ धावा केल्या. यावेळी ७ फलंदाज बाद झाले. पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत लखनऊचे सलामीवीर झटपट बाद केले. सामना सुरु झाला तेव्हा १ धावेवर १ फलंदाज बाद अशी लखनऊच्या संघाची अवस्था होती. मिचेल मार्श शून्यावर बाद झाला. तर त्यानंतर मार्कराम याने २८ धावा केल्या. पुरन हा ४४ धावांवर बाद झाला. आयुष बडोनी याने ४१ धावा केल्या. मिलर १९ धावांवर बाद झाला. अब्दुल समद याने २७ धावा केल्या. तर ठाकूर ३ धावांवर नाबाद राहिला आवेश खान याला एकही धाव काढता आली नाही. युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून मैदानातील कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील गोष्टींमुळेच अधिक चर्चेत राहिला. भारतीय संघातून बाहेरस्ता रस्ता अन् गोडी गुलाबीच्या संसारात पडलेला मिठाचा खडा या सारख्या नकारात्मक गोष्टी घडत असताना दुसर्‍या बाजूला मेगा लिलावात त्याला मोठी लॉटरली लागली. भारतीय संघा बाहेर असतानाही मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं मोठी रक्कम मोजत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांत डावखुर्‍या भारतीय फिरकीपटूच्या आयुष्यातील ही एक चांगली अन् सकारात्मक घटना आहे. आता तो पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याला काल १ महत्त्वपुर्ण बळी मिळाला. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
पंजाब : प्रियांश आर्या ८, नीहाल वाद्रा ४३, प्रभासिमरनसिंग ६९, श्रेयस अय्यर नाबाद ५२, एकूण १६.२ षटकांत १७७/२
लखनऊ : मार्कराम २८, मिचेल मार्श ०, पुरन ४४, पंत २, आयुष बडोनी ४१, डेविड मिलर १९, अब्दुल समद २७, ठाकूर नाबाद ३, आवेश खान नाबाद ० अवांतर ७ एकूण २० षटकांत १७१/७ 

Related Articles