नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर   

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वय वर्षे तीन ते आठ या वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर जास्त भर आहे. कारण याच वयामध्ये बुद्धिमत्तेचा विकास होतो आणि कल्पना शक्तीचा विकास होतोे. त्यामुळे कोणतेही पुस्तक व परीक्षा न घेता अनुभवातून आणि खेळातून शिक्षण देण्याची यात कल्पना आहे. असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. मिलियन शाळेमध्ये आयोजित शिक्षक संवाद कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 
 
जावडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मागचा हेतू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या तरतुदी, तसेच व्यावसायिक व कला क्रीडा क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी पदवी पातळीपर्यंत दिलेले विविध विकल्प याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्य ही आत्मसात करून जीवन सुकर बनवावे असा मोलाचा सल्ला दिला.
 
मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर या शाळेमध्ये जावडेकर यांच्या खासदार निधीतून शाळेच्या संगणक वर्गाला ४४ संगणक, १० इंटरऍक्टिव्ह पॅनल्स आणि ५ लॅपटॉप देण्यात आले होते. जावडेकर यांच्या हस्ते सोमवारी याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी  व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी  केदार वाळिंबे, शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका वैद्य, शिक्षक व पालक वर्ग, विद्यार्थी प्रतिनिधी आणि बँकिग क्षेत्रात कार्यरत असलेले सुधीर दप्तरदार उपस्थित होते.

Related Articles