जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजपासून सकाळच्या सत्रात भरणार   

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून (१ एप्रिल) सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. या शाळा सात ते सव्वा अकरा वाजेपर्यंत भरवल्या जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे  यांनी सोमवारी दिली.वाढत्या उन्हामुळे शालेय विद्यार्थ्याच्या आरोग्यावर विपरीत होणारा परिणाम टाळण्यासाठी विविध शिक्षक संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याची मागणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, दरवर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १ एप्रिल पासून सकाळच्या सत्रात भरवल्या जातात. त्यामुळे नेहमी प्रमाणेच शाळा आजपासून सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने सर्व शाळा एकाच वेळेत भराव्यात आणि एकाच वेळेत सुटाव्यात अशी खबरदारी घेण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने शाळांचे वेळापत्रकही सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या वेळेत एकवाक्यता असावी, या उद्देशाने हे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
 
सकाळच्या सत्रातील प्राथमिक शाळेसाठीचे वेळापत्रक
 
सकाळी ७ ते ७.१५ - परिपाठ
७.१५ ते ९.१५ - पहिली ते चौथी तासिका
९.१५ ते ९.४५ - भोजनासाठी सुट्टी
९.४५ ते ११.१५ - तीन तासिका
११.१५ सुट्टी प्रत्येक तासिका ३० मिनिटांची आहे.

Related Articles