अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण   

येरवडा : वडगावशेरी मतदारसंघात सर्वत्र अनधिकृत जाहिरात फलक लावले जात आहे. सगळीकडे विद्रुपीकरण होत असूनही महापालिका आकाश चिन्ह विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त याकडे दुर्लक्ष करत असल्यांनी नागरिकांनी प्रशासना बाबत खंत व्यक्त केली आहे.वडगावशेरी नगर रस्ता व  येरवडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वडगावशेरी मतदारसंघाचा भागा येता. अनेक कार्यकर्ते,नेते, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटना आणि खाजगी मंडळाचे पदाधिकारी कोणालाही न घाबरता किंवा अधिकार्‍यांची परवानगी न घेता. सरळ प्रत्येक चौकात आणि पथदिव्यावर फलक लावत आहे. तसेच अनेक इमारतीवर ही अनधिकृत फलक  (होर्डिंग ) लावले आहे. तरी अधिकारी कोणतीच कारवाई करत नाहीत. महापालिका आकाश चिन्ह  विभागाचे अधिकारी, फलक तयार करणारे कारखानदार आणि स्थानिक पोलिस प्रशासन यांची लागेबंधे असल्याने चौकाचौकात फलकबाजी केली जात आहे. प्रत्येक महिन्याला लाखो रूपयेचा हप्ता मिळत असल्याने कारवाई होत नसल्याची ही चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. देशविदेशाहून याच परिसरातून नागरिक येत असतात.तसेच मंत्री,खासदार, आमदार पुण्यात कार्यक्रमा निमित्त येत असतात. असे विद्रुपीकरणामुळे शहाराची प्रतिष्ठा जात आहे.  पुणे पोलिस आयुक्तांनी याची सखोल चौकशी करून फलक लावणार्‍यांना आणि अधिकार्‍यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

Related Articles