ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष   

वॉशिंग्टन : अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्या (बुधवार) पासून भारतासाठीं आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. आता तो दिवस जवळ येत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. त्यात चीन, कॅनडा, युरोप महासंघाचा समावेश आहे. या देशांवर अगोदरपासून वाढीव आयात शुल्क लागू करण्यात आले आहे.  जेवढे आयात शुल्क देश आकारतील तेवढेच ते अमेरिका देखील आकारले, असे त्यांनी घोषित केले आहे. भारतासाठी त्यानी उद्या (बुधवार) पासून आयात शुल्काची अंमलबजावणी केली जाईल, असे  घोषित केले. वाढीव आयात शुल्क लागू केल्यामुळे अमेरिकेच्या उत्पादनांना अधिक बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच परदेशी वस्तू महाग झाल्यामुळे केवळ अमेरिकेच्या वस्तू खरेदी करण्यावर नागरिक भर देतील, असा त्याचा होरा आहे. एक प्रकारे ते अमेरिका फर्स्ट धोरण ते राबवत आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने  चीन, कॅनडा, युरोपिय महासंघ आणि आता भारताला बसणार आहे. 

Related Articles