छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार   

दंतेवाडा : छत्तीसगढच्या बस्त येथे सुरक्षा रक्षकांसोबत उडालेल्या चकमकीत  महिला नक्षलवादी चकमकीत ठार झाली आहे. तिला पकडून देणार्‍यास २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
 
दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात सकाळी सुरक्षा दलाचे जवान गस्त घालण्यासाठी जात हाजेते. तेव्हा सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात गोळीबार झाला. कारवाईत जिल्हा राखीव दलाने भाग घेतला. दंतेवाडातील गेडाम आणि बिजापूरच्या बहिरामगडच्या जंगलात चकमक उडाली. गोळीबारानंतर घटनास्थळी पाहणी केली तेव्हा रेणुका  उर्फ छैती उर्फ सरस्वती हिचा मृतदेह सापडला. ती तेलंगणा राज्यातील वारंगळची रहिवासी असल्याचे आणि नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याचे उघड झाले. तिला पकडून देणार्‍यास २५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. 
 

Related Articles