दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर   

नवी दिल्ली : द्वेषाचे राजकारण सुरू असतानाही देशातील दोन तृतियांश नागरिक हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाहीत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी सोमवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
 
अय्यर म्हणाले, एवढेच नाही, तर भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आशियाई देश आणि दुबई, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये राहणार्‍या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी ईदच्या शुभेच्छा देतो. मी अशा भारतातून बोलत आहे, जेथील भूमी सर्वांचे स्वागत करते. या देशात प्रत्येकाने आनंदाने, शांततेने राहावे आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकायला हवे. यावर कसल्याही द्वेषाची गरज नाही, देशात द्वेष पसरवला जात आहे. मात्र, असे असूनही, दोन तृतियांश भारतीयांनी, यात किमान ५० टक्के हिंदूंचा समावेश आहे, कधीही अशा राजकीय शक्तींना पाठिंबा दिला नाही, ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायची इच्छा आहे. हा एक सेक्युलर देश असून, येथे सर्वजण सोबत राहतात, असे अय्यर यांनी नमूद केले. 
 

Related Articles