बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा   

मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कंपनीने आपल्या भागधारकांना २:१ च्या प्रमाणात बोनस समभाग देण्याची घोषणा केली आहे. बीएसईने लिस्टिंगनंतर आतापर्यंत १७० रुपये प्रतिसमभाग बोनस दिलेला आहे.
 
रविवारी बीएसई कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनसचे वाटप करण्यासंदर्भातील प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळासमोर मांडण्यात आला, त्याला संचालक मंडळाच्या सदस्यांनी मान्यता दिली. बीएसई लिमिटेड कंपनी सन २०१७ मध्ये भारताच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाली होती. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस समभाग देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी कंपनीने २०२२ मध्ये प्रथमच २:१ च्या प्रमाणात बोनस समभाग देण्याची घोषणा केली होती. २०२४ मध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक समभागावर १५ रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती.

Related Articles