भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी   

नेप्यिडॉ : म्यानमार व थायलंडमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये असल्याने या देशात मोठी जीवित व वित्तहानी झाली. शेकडो इमारती कोसळल्या आहेत, हजारो घरे ढासळली आहेत. या भूकंपानंतर बाधित परिसरात बचाव मोहिमा सुरू आहेत. बचाव पथकातील हजारो कर्मचारी व लष्कराचे जवान गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत शेकडो लोकांना त्यांनी डेब्रिज खालून सुखरूप बाहेर काढले. तसेच अनेक मृतदेह देखील बाहेर काढले आहेत.
 
म्यानमारमधील लष्करी सरकारने सांगितले आहे की, या भूकंपात १,७०० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३,५१४ नागरिक जखमी झाले आहेत, तर १५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. मात्र, तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, या भूकंपात २,०२८ जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्या ३,६०० हून अधिक आहे.

म्यानमारमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य 

म्यानमारमधील मंडाले या दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात रस्त्यांवर कुजलेल्या मृतदेहांचा खच पडला असून, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. येथील भूकंपबळींचा आकडा आता १७०० वर गेला असून, ३४०० जण गाडले गेले आहेत. भूकंपाला दोन दिवस उलटले तरी स्वयंसेवक अजूनही जिवंत  नागरिक सापडण्याच्या आशेने मातीचे ढिगारे हटविण्यात व्यस्त आहेत.शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडालेजवळ आल्याने अनेक इमारती कोसळल्या आणि शहरातील विमानतळासारख्या अन्य  पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. 
 

 

Related Articles