सीरियात काळजीवाहू सरकार स्थापन   

हंगामी अध्यक्ष जुलानी यांनी केली २३ मंत्र्यांची नियुक्ती

दमास्कस : सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा उर्फ अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू सरकारची घोषणा केली. तसेच सरकारमध्ये २३ नव्या मंत्र्यांची नियुक्ती केली. नवे मंत्रिमंडळ सीरियातील विविध वांशिक आणि धार्मिक समुदायांचे प्रतिनिधित्व करणार आहे.
 
माजी अध्यक्ष बशर अल-असद यांच्या बंडानंतर चार महिन्यांनी सीरियामध्ये  हंगामी सरकार स्थापन झाले आहे. २३ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात एका ख्रिश्चन महिलेचाही समावेश करण्यात आला आहे. गुप्त्ाचर विभागाचे प्रमुख अनस खट्टाब यांना देशाचे नवे गृहमंत्री बनवण्यात आले आहे. या सरकारमध्ये पंतप्रधानपद नाही. त्यांच्या जागी जुलानी एका सरचिटणीसची नियुक्ती करणार आहेत. हे काळजीवाहू सरकार पुढील पाच वर्षे सत्तेत राहील. या काळात निवडणुका घेतल्या जातील.
 
डिसेंबर २०२४ मध्ये हयात तहरीर अल-शाम यांच्या नेतृत्वाखाली बशर अल-असद यांची राजवट उलथवून टाकण्यात आली. जुलानी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटाने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला आणि असद सरकारची ५४ वर्षांची राजवट संपुष्टात आली. या राजकीय बदलानंतर बशर अल असद यांनी मॉस्कोमध्ये आश्रय घेतला.

सत्तापालटाची धोरणे

२०१६ मध्ये गृहयुद्धाची तीव्रता कमी झाल्यानंतर जुलानी यांनी लष्करी शक्ती मजबूत करायला सुरुवात केली. चीनच्या उइगर मुसलमानांपासून आधार मिळवला. 

जुलानींचा प्रवास बंडखोरीपासून नेतृत्वाकडे

जुलानी यांनी वैद्यकीय शिक्षण सोडले आणि सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला करण्याच्या शक्यतेने घाबरून त्याने अल कायदाशी संपर्क केला. त्यानंतर २०१२ मध्ये त्याने अल कायदाची सीरिया शाखा ’जभात अल-नुसरा’ची स्थापना केली. २०१७ मध्ये जुलानी यांनी हयात तहरीर अल-शामची स्थापना केली आणि सीरियाला असद राजवटीपासून मुक्त करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न वाढवले.
 

Related Articles