नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात   

हिंसाचार प्रकरणी दंडही ठोठावला

काठमांडू : काठमांडूच्या काही भागात राजेशाही समर्थक निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर नेपाळचे राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली. तसेच हिंसाचार प्रकरणी दंडही ठोठावला. 
 
शुक्रवारी हिंदू राष्ट्राची फेरउभारणी करण्याची मागणी करणारे सुरक्षा रक्षक आणि राजेशाही समर्थक आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीत एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनसह दोघांचा मृत्यू झाला, तर ११० जण जखमी झाले. या घटनेनंतर ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला. ज्ञानेंद्र शाह यांच्यासाठी २५ सुरक्षा कर्मचार्‍यांची तैनाती केली जात होती. आता ही संख्या कमी करून १६ करण्यात आली आहे. काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडूच्या बाहेरील महाराजगंज येथील निर्मला निवास येथील त्यांच्या निवासस्थानी पत्र पाठवून नुकसान भरपाई म्हणून ७ लाख ९३ हजार रूपये देण्याची विनंती केली आहे.
 

Related Articles