टेस्लाच्या मोटारी पेटवा!   

अ‍ॅलन मस्क यांच्याविरोधात अमेरिका, युरोपमध्ये निदर्शने

सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकेचे अब्जाधिश उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांच्याविरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते. त्यानंतर मस्क यांनी आक्रमक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेसह युरोपमधील काही शहरांतील टेस्लाच्या शोरुमबाहेर नागरिकांनी  जोरदार निदर्शने केली. मस्क यांना मंत्रिमंडळातून हाकला, टेस्लाच्या मोटारी पेटवा, नाझीवादी मस्कचा निषेध अशा आशयाचे फलक नागरिकांनी आंदोलनावेळी फडकावले.
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात मस्क यांना स्थान दिल्यानंतर त्यांनी नवा सरकारी कार्यक्षमता विभाग तयार केला आहे. त्या माध्यमातून सरकारकडून होणार्‍या अनावश्यक खर्चांंवर अंकुश आणण्याची पावली उचलली आहेत. सरकारकडून अनेक संस्थंना निधी दिला जातो. त्यात कपातीचा निर्णय घेतल्याने संबंधित संस्था आणि त्यावर अवलंबून असणारे संतापले आहेत. त्यांनी निदर्शने केली. शनिवारी टेस्लाच्या सुमारे २७७ शोरुम आणि सेवा केंद्रासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न झाला होता,. दुपारनंतर न्यूजर्सी, मॅसॅच्युसेट्स, कनेक्टिकट, न्यूयॉर्क, मेरीलँड, मिनेसोटा आणि मस्क यांचे राज्य टेक्सास येथील शोरुमबाहेर जमाव गोळा झाला होता. अ‍ॅलन यांचा निषेध करत असाल तर हॉर्न वाजवा, अब्जाधीश ब्रोलिगार्कीशी लढा, अ‍ॅलन मस्क याला जावे लागेल. अशा घोषणा त्यांनी दिल्या. राजधानी वॉिशिंग्टन, शिकागो, इंडियनपोलिस, सिनसिनाटी आणि सिएटल, तसेच व्हर्जिनिया, पेनसिल्व्हेनिया आणि कोलोरॅडोमधील शहरांतील शोरुमबाहेर जोरदार निदर्शने केली. त्याशिवाय डब्लिन, कॅलिफोर्निया येथेही काही नागरिकांनी अमेरिकेचे ध्वज घेत निदर्शने केली. बर्कले येथील चौकात मोठा जमाव आला होता. त्यांनी ड्रम बडवत मस्कविरोधी घोषणा दिल्या. पेशाने शिक्षक असलेला ऑकलंड येथील एक आंदोलक म्हणाला,  आम्ही फॅसिस्ट राज्यत राहात आहोत. देशाच्या भल्यासाठी मस्क यांना रोखलेच पाहिजे. केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरातील २३० ठिकाणी निदर्शने झाली.  युरोपमध्ये निदर्शनाची संख्या तुलनेत कमी आहे. ब्रिटनची राजधानी लंडन येथे नागरिकांनी मोटारीचे हॉर्न वाजवत मस्क यांचा निषेध केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्ष पदाच्या शपथविधी सोहळ्यात ट्रम्प यांनी जर्मनीचा हुकूमशाह अ‍ॅडोल्फ हिटलर याच्या नाझी सैनिकांप्रमाणे सलाम ठोकला होता. ही बाब छायाचित्रकारांनी टिपली होती. एकंदरीत नाझीशाही समाप्त झालेली नाही, असे जणून ते दाखवून देत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. 
 

Related Articles