लष्कराच्या विशेष अधिकार कायद्याला मणिपूरमध्ये मुदतवाढ   

नागप्रदेश, अरुणाचलच्या काही भागातही लागू

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये १३ पोलिस ठाण्यांची हद्द वगळून उर्वरित सर्व भागांत लष्कराच्या विशेष अधिकार कायद्याला (अस्फा) सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने रविवारी घेतला आहे.  नागप्रदेश, अरुणाचल प्रदेशातील काही भागांत कायद्याला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. 
 
संवेदनशील भागात लष्कराला कठोरपणे कारवाई करता यावी, यासाठी कायद्याला मुदतवाढ देण्यात आली. त्याशिवाय नागप्रदेशातील आठ जिल्ह्यांत आणि २१ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अगोदरच लागू असलेल्या कायद्याला आणखी सहा महिने मुदतवाढ दिली असल्याचे केंद्र सरकारने काढलेल्या अधिसुचनेत नमूद केले आहे.  अरुणाचल प्रदेशातील तिराप, चांगलांग आणि लाँगडिंग जिल्ह्यांत आणि नामसाई जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतही कायद्याला एक एप्रिलपासून आणखी सहा महिने मुदतवाढ दिली.
 
लष्कराचा विशेष अधिकार कायदा अनेकदा टिकेचा धनी बनला आहे. कारण अधिकारानुसार लष्कराला पूर्वपरवानगी शिवाय कोठेही शोध मोहीम राबविता येते, कोणालाही अटक अथवा गोळीबार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. केंद्र सरकारने मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर १३ पोलिस ठाण्यांची हद्द वगळून उर्वरित राज्यात लष्कराच्या विशेष अधिकार कायद्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पाच जिल्ह्यांतील १३ पोलिस ठाण्यांचा भाग अजूनही अस्वस्थ आहेत. त्यामुळे तेथे १ एप्रिल २०२५ पासून पुढील सहा महिने आणि पुढील आदेश येईपर्यंत कायदा लागू राहणार असल्याचे म्हटले आहे. 
 

Related Articles