मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू   

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाण पुलावरून केरोसीन सदृश्य कच्च्या रसायनाचा भरलेला टँकर रविवारी संध्याकाळी खाली कोसळला. या अपघातात टँकर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मस्तान नाका उड्डाणपुलाच्या गुजरातच्या दिशेने जाणार्‍या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. टँकर पुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर सुमारे वीस फूट उंचीवरून पुलाच्या खाली कोसळला. अपघात ग्रस्त टँकरमधून केरोसीन सदृश्य कच्च्या तेलाची गळती सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने कच्चे तेल ज्वलनशील नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. स्थानिकांच्या मदतीने अपघातात गंभीर जखमी टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,त्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.
अपघातानंतर  टँकर मधील गळती सुरु झाली होती. 
 
३० हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून तेलाची मस्तान नाका भागातील दुकानदार, रिक्षा चालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बघ्यांच्या गर्दीला हटवून परिसर निर्ममनुष्य केला.  
 

Related Articles