माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस   

पुणे : विद्येचा माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये जादूटोण्यासारखा प्रकार घडला असल्यास समोर आला आहे.  हा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती असलेल्या आणि पुणे महापालिकेत माजी महापौर असलेल्या दत्ता धनकवडे यांच्या घरासमोर घडला आहे.
 
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या घराच्या समोर एका ४५ वर्षीय महिलेने जादूट होण्याचा प्रकार केला असल्याचा समोर आला आहे. दत्ता धनकवडे रहात असलेल्या धनकवडी परिसरातील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर एका महिलेकडून जादूटोण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
 
गेल्या चार महिन्यांपासून संबंधित महिलेकडून धनकवडी परिसरात जादूटोण्याचे प्रकार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. जादूटोणाच्या माध्यमातून अघोरी प्रकार धनकवडी परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त होते आहे. अशातच हा अघोरी प्रकार माजी महापौर असलेल्या दत्ता धनकवडे यांच्या घरासमोर झाला. यानंतर या प्रकरणांमध्ये भारती विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये काल रात्री उशिरा स्थानिकांनी संबंधित महिला विरोधात तक्रार दाखल केली आहे, पोलीस देखील पुढचा सखोल तपास करत आहेत.
 
दत्ता धनकवडे यांनी सांगितले, की काल सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान एक महिला आमच्या सोसायटी जवळ काही भावल्या आणि इतर गोष्टींसह जादूटोणा करत असल्याचा संशय सोसायटीतील रहिवाशांना आला त्यानंतर त्यांनी त्या महिलेला पकडून पोलिसांच्या हवाली केला आहे. गेल्या काही दिवसांपासून धनकवडी परिसरातील अनेक घरांच्या बाहेर असे जादूट होण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. 
 
शनिवारी अमावस्या असल्याने असा काहीतरी प्रकार घडेल अशी पुसटशी कल्पना असल्याने नागरिक या गोष्टींवर लक्ष ठेवून होते. अशातच त्या महिलेने आमच्या घरात जवळील सोसायटी च्या परिसरात भावलीसह अघोरी प्रकार करण्यात सुरुवात केली. त्यानंतर नागरिकांनी तत्परता दाखवत त्या महिलेला पोलिसांच्या हवाली केला आहे.
 
पोलिसांनी आता हा नेमका प्रकार काय आहे याची रीतसर चौकशी करावी तसेच या महिलेला कोणी हे करण्यासाठी सांगितले आहे का याबाबत देखील पोलिसांनी चौकशी करून सर्व सत्य समोर आणावे अशी आमची मागणी असल्याचे दत्ता धनकवडे यांनी सांगितले आहे.
 

Related Articles