नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक   

गुवाहटी : आयपीएल २०२५ च्या हंगामात रविवारी राजस्तान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात राजस्तान संघाचा नीतीश राणा याने ३६ चेंडूत ८१ धावा केल्या. यावेळी त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्याआधी यशस्वी जैस्वाल ४ धावांवर तर संजू सॅमसन २० धावांवर बाद झाले. रियान पराग याने ३७ धावा केल्या. ध्रुव ज्युरेल याने ३ धावा केल्या. वानिंदू हसरंगा याने ४ धावा केल्या. 
 
याआधी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात लखन सुपर जायंट्सचा पराभव केला. त्या सामन्यात, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने १ बळीने विजय मिळवला. सध्या दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने राजस्तान रॉयल्सचा पराभव केला. पण त्यांना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे, सनरायझर्स हैदराबाद २ सामन्यांत २ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
 

Related Articles