व्हॉट्सऍप कट्टा   

पुणेरी वाक्प्रचार 

आयुष्याचा नवले ब्रीज होणे
अर्थ : आयुष्यात नवनवीन संकटे सतत येत राहणे   
                                       
आयुष्याचा चांदणी चौक होणे.
अर्थ : आयुष्यात खूप कन्फ्युजन असणे.
                                     
आयुष्याचा युनिव्हर्सिटी चौक होणे
अर्थ : आयुष्यात कधीही काहीही न सुधारणे
 
आयुष्याचा झेड ब्रीज होणे..
अर्थ : पुन्हा एकदा ’ती सध्या’ आयुष्यात येणे...
 
आयुष्याचा भिडे पुल होणे...
अर्थ : काम कमी पण प्रत्यक्षात गवगवाच जास्त होणे
 
आयुष्याचा लक्ष्मी रोड होणे
अर्थ : सुबत्ता येणे...
 
आयुष्याचा एफ.सी रोड होणे
अर्थ : मैत्रिणींची वानवा नसणे
 
आयुष्याचा सिंहगड रोड होणे.
अर्थ : आयुष्याला अर्थ न रहाणे
 
आयुष्याचा कर्वे रस्ता होणे.
अर्थ : आयुष्य सुखकर होणे
 
आयुष्याचा पौड रस्ता होणे.
अर्थ : आयुष्यात सुखासवे समृद्धी येणे
 
आयुष्याचा टिळक रस्ता होणे...
अर्थ : बुद्धिमान लोकांबरोबर काळ व्यय होतोय असे वाटणे
 
आयुष्याचा मेन स्ट्रीट होणे.
अर्थ : परदेशात गेल्याचे समाधान मिळणे.
---
सासू : प्लेट घासल्यावर त्यात चेहरा दिसायला हवा इतकी स्वच्छ करत जा.
सून : उद्यापासून आरशावरच जेवत जा.
----
यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोके शांत पाहिजे
 
चीनमधील एक प्रसिध्द दंत कथा आहे, एक क्रूर सम्राट राजा चुंग लुई... चीन मधील एका मागून एक लहान राज्ये काबिज करतो. तुम्ही मला शरण या नाही मरायला सामोरे जा, असा त्याचा आदेश असे. काही छोट्या राजांनी लढून प्राण गमावले तर काही जीवाच्या भीतीने शरण येऊन गुलाम झाले. जेव्हा चुंग लुईचे आक्रमण मींग झु या राणीच्या राज्याच्या सीमेवर येऊ ठेपले, तेव्हा राणी मिंग झुला काय करावे सुचेना. इतक्या बलाढ्य राजासमोर आपला टिकाव लागणार नाही, आपले राज्य वाचवायचे कसे? याची तिला चिंता लागली. तिला एक शक्कल सुचली व एक पत्र तिने चुंग लुईला पाठवले. राजे, तुम्ही इतके ताकदवान... आम्हाला सहज जिंकून आमचा अस्त सहज करू शकता. पण त्यात तुमचा खूप मोठा तोटा आहे. माझ्या राज्यामध्ये खूप मोठ्या सोन्याचा, हिर्‍यांचा खजिना आहे. खजिना अनेक ठिकाणी पुरून ठेवला आहे, तुम्ही जर आम्हाला मारून टाकले तर हा खजिना कोठे आहे, तुम्हालाच कळणार नाही. आम्ही तुम्हाला जरूर शरण येऊ पण त्यापूर्वी राज्यातील सर्व खजिना कोठे लपवला आहे. ह्याचा नकाशा तुम्हाला दाखवायचा आहे, त्यानंतर तुम्ही मला खुशाल मारा किंवा दया करा. मग एका तंबूत बैठक ठरली. तंबूत दोघेच असतील, सर्व सैनिक बाहेर असतील. राणी गुप्तधनाचा नकाशा राजाला एकट्यालाच दाखवेल असे ठरले. राणी नकाशा घेवून तंबूत आली तो गोल गुंडाळलेला होता. तिने तो टेबलावर ठेवला व हळूहळू उघडू लागली. राजाची उत्सुकता वाढीस लागली. किती खजिना मिळतोय ह्या विचाराने आनंदी झाला होता. पण चाणाक्ष राणीने त्या नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती. नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजाच्या ध्यानीमनी नसताना त्याचे धड व मुंडी वेगळी करुन वध केला. सगळीकडे हाहा:कार माजला. सैन्य पळू लागले. राणीच्या सैन्यांनी हल्ला चढवून शत्रूचे सैन्य पळवून लावले व अशा रीतीने राणी मींग झुने आपले राज्य वाचवले. आज मराठी माणसाकडे मोठे भांडवल नाही, खूप चांगले शिक्षण नाही, अनुभव नाही. उद्योग व व्यवसाय करायचा म्हटलं तर बलाढ्य भांडवलदार यांच्याशी स्पर्धा आहे. तेव्हा आपण शांत डोक्याने, अशा आयडिया शोधून, चाणाक्षपणे गनिमीकाव्याने विजय मिळविण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने बलाढ्य शत्रूची बोटे तोडली व कोथळा काढला; तसे मराठी माणसाने कमी भांडवलात, मनुष्यबळात आपला उद्योग व्यवसाय कसा चालविता येईल व बलाढ्य स्पर्धकाला कसे गनिमीकावा व कल्पक वृत्तीने डोके चालवून एकीने नामोहरम करून बाजारपेठ काबीज करता येईल हे पाहिले पाहिजे. डोके शांत ठेवले तरच ते चालेल व आयडिया सुचतील. मराठी माणसाने रागिट न बनता, शांत व चाणाक्ष बनले पाहिजे. भडकणारा दुसर्‍याकडून वापरला जातो तर शांत राहणारा डोकेबाज राज्य करतो. देशाच्या उद्योग विश्वावर मराठी माणसाचे राज्य आले पाहिजे.
 

Related Articles