छत्तीसगढमध्ये ५० नक्षलवादी शरण   

बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात ५० नक्षलवादी रविवारी पोलिसांना शरण आले. त्यात १४ जणांवर ६८ लाखांचे बक्षिस होते. राज्याचे पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीसमोर ते शस्त्रे टाकून ते शरण आले आहेत. नक्षलवादी चळवळीकडे चुकीने आकर्षित झाले, आता खरे सत्य समजल्याने समाजाच्या प्रमुख प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी तुमचे चांगले गाव योजना आणली आहे. ती अत्यंत भावली असल्यामुळे आम्ही शरण येण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शरण आलेल्या नक्षलवाद्यावर लाखो रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. 
 

Related Articles