हिमाचलमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू   

कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील गुरुद्वारा मणिकरण साहिबजवळ रविवारी दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू तर, पाच जखमी झाले. दरड कोसळून एक मोठे झाड वाहनावर पडले. त्याच्या खाली परिसरातील काही जण अडकले होते. 
 
जोरदार वार्‍यामुळे झाड उन्मळून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर पडले. मृतांमध्ये एक विक्रेता, मोटारमध्ये बसलेली एक व्यक्ती आणि तीन पर्यटकांचा समावेश आहे. झााडाखालून पीडितांना बाहेर काढताना बरेच प्रयत्न करावे लागले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुल्लूचे अधिकारी अश्विनी कुमार यांनी सहा जण मरण पावल्याचे सांगितले. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकांनी पाच जखमींना जरी येथील स्थानिक सामुदायिक रुग्णालयात हलवले आहे, अधिकारी मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
 

Related Articles