बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट   

 

बीड : बीड जिल्ह्यातील प्रार्थनास्थळात एका व्यक्तीने ठेवलेल्या जिलेटीन कांडीचा रविवारी स्फोट झाला. त्यात कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
गेवराई तालुक्यातील अर्धा मसाला गावातील प्रार्थनास्थळात पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यामध्ये काही भागाचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विजय राम गव्हाणे (वय २२) आणि श्रीराम अशोक सागडे (वय २४), अशी त्यांची नावे आहेत ते गेवराई तालुक्याचे रहिवासी आहेत. स्फोटामुळे गावात तणावाचे वातावरण होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
 
अधिकार्‍यांनी सांगितले की, एक व्यक्ती मशिदीच्या मागून बाजूने आला आणि तेथे काही जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. नंतर स्फोट झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी तलवाडा पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. दरम्यान, स्फोटात प्रार्थनास्थळाच्या अंतर्गत भागाचे काहीसे नुकसान झाले. बीडचे पालिस अधीक्षक नवनित कनवट आणि अन्य ज्येष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाँबशोधक आणि नाशक पथक, न्याय वैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.. दरम्यान, स्फोटात प्रार्थनास्थळाच्या ज्या भागाचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने डागजुजी सुरू केली आहे. फुटलेल्या टाईल्स काढून तेथे नव्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. गावातील शांतता समितीची बैठकही बोलावली. अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधिकार्‍यांनी केले. 
 

Related Articles