बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले   

ओडिशातील दुर्घटनेत एक ठार, सात जखमी

कटक : ओडिशातील कटक जिल्ह्यात रेल्वेला रविवारी अपघात झाला. बंगळुरू कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळवरून घसरले. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला  असून सात जण जखमी झाले आहेत. 
 
कटक जिल्ह्यातील मंगुलीजवळच्या निरगुंडी येथे सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी अपघात झाला, अशी माहिती पूर्व किनारपट्टी रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी दिली. सात जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. जखमींची संंख्या दहा पेक्षा अधिक नाही, असा दावाही केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया द आणि ओडिशा अग्निशमन दलाच्य कर्मचार्‍यांनी मदतकार्य राबविले.ते सुरूच आहे.
 
एक्स्प्रेस कर्नाटकाची राजधानी बंगळुरूहून आसाममधील कामाख्या शहराकडे जात होती. उन्हाळ्यामुळे अनेक प्रवासी आजाराी देखील पडले होेते. अशा आवस्थेत ते प्रवास करत असताना दुर्घटना घडल्यामुळे त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य शिबिरात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन नंतर त्यांना सोडले. काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
 

 

Related Articles