पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू   

नवी दिल्ली : पर्यावरणपूरक जीवनशैली नागरिकांनी स्वीकारावी, त्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी केले. 
विज्ञान भवन येथे पर्यावरण -२०२५ परिषदेत त्या बोलत होत्या. पर्यावरणाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे भविष्यांतील संकटे टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केवळ पुढाकार नव्हे तर, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे काळाची गरज आहे. तसेच पर्यावरण रक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जागृती केली पाहिजे. आदिवासी नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात राहतात. गेली अनेक दशके ते पर्यावरणाचे एकप्रकारे संरक्षण करत आहेत. जागतिक तपमान वाढीवर तीव्र चिंता व्यक्त केली जात असताना नागरिकांनी देखील आदिवासींप्रमाणे जीवनशैली स्वीकारली तर आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला. भावी पिढीला शुद्ध पर्यावरणाचा वारसा मिळावा, यासाठी सध्याच्या पिढीने कार्य 
केले पाहिजे. 
 
त्या म्हणाल्या, पालकांना मुलांचे शिक्षण आणि करिअरची चिंता असते. पण, भावी पिढीला शुद्ध प्राणवायू मिळणार का ? याचा विचार देखील केला जात नाही. हिरवीगार भूमी आणि चिवचिवाट करणारे पक्षी, असे सुंदर दृष्य सर्व ठिकाणी दिसेल, अशी व्यवस्था निमार्ंण करायला हवी. त्यासाठी पर्यावरणास अनुकूल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. 
 

Related Articles