कामराविरोधात आणखी तीन तक्रारी   

नवी दिल्ली : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात आणखी तीन तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारी खार पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. या तीनही तक्रारी शिंदे गटाने दाखल केल्या आहेत.शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या दाखल केलेल्या तक्रारीवरुन कामरा विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आणखी तीन तक्रारी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये मयूर बोरसे, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संजय भुजबळ आणि नाशिकच्या नांदगाव मनमाड येथे सुनील जाधव यांनी तक्रार दिली आहे.
 
कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक कविता म्हटली होती. त्यावरुन, राजकीय वातावरण तापले आहे.कामरा याने शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. कामराने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर केला होता; त्या स्टुडिओची शिंदे यांच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. या प्रकरणात पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावले होते. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने कामरा याला ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
 

Related Articles