पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू   

मुंबई : मुंबईचे पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांचा तेलंगणातील नागरकुर्नूल येथे अपघातात मृत्यू झाला. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता.पठारे हे २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते. श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पठारे नातेवाईक भगवत खोडके यांच्यासह गेले होते. त्यावेळी एका मालमोटारीने त्यांच्या मोटारीला धडक दिली. यात पठारे गंभीर जखमी झाले. पठारे यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पठारे जानेवारीपासून मुंबईतील बंदर परिमंडळ येथे उपायुक्त पदावर कार्यरत होते. पठारे मूळचे वाळवणे (ता. पारनेर) येथील होते. 
 

Related Articles