वीज होणार स्वस्त   

मुंबई : येत्या १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. ‘महावितरण’ने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विविध सुनावण्या पार पडल्या. आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले.या आदेशानुसार, महावितरणने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार, २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचे पहिले अंदाजपत्रक सादर करताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती. 
 

Related Articles