शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी   

मंचर, (प्रतिनिधी) : अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडी शनी मंदिर येथे शनि अमावस्यानिमित्त भाविकांची अभिषेकासाठी आणि दर्शनासाठी शनिवारी गर्दी केली होती.  गोरक्षनाथ टेकडीचे संस्थापक श्री श्री १००८ योगी रवीनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांनी १९ वर्षांपूर्वी शनीच्या शिळेची स्थापना केली होती.शनिवारी पहाटेपासूनच अभिषेकासाठी पुणे खेड, आंबेगाव, जुन्नर,शिरूर शिक्रापूर, पारगाव, मावळ तसेच पंचक्रोशीतील शनि भक्त उपस्थित होते. शनि महाराज की जय अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
 
महंत योगी कृष्णनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा खेतानाथ ट्रस्टच्या वतीने खजिनदार किशोर अडवाणी, गोवर्धन उद्योग समूहाचे देवेंद्रशेठ शहा, सुरेशभाऊ भोर, संजय मिश्रा, डी.के.वळसे पाटील, मिलिंद खुडे, ऋषिकेश गावडे, प्रवीण नहार, भूषण थोरात, उमेश चक्कर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शनी महाराजांना महाअभिषेक करण्यात आला. 
 
शनी अमावस्यानिमित्त भाविकांसाठी मसालेभात, पुरी भाजी, बुंदी, थंडगार मठ्ठा, जिलेबी अशा अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनैश्वर ग्रूप, मणिपूर शेवाळवाडी तसेच अनेक दानशूर भक्तांनी अन्नदानासाठी मोठे योगदान दिले. पौराहित्य महेशकाका पोळ यांनी केले. नियोजन व व्यवस्था मुख्य प्रबंधक पुजारी तुफाननाथ महाराज, स्वागत निघोट यांनी पाहिली.
 

Related Articles