कर्करोग रुग्णांसाठी डे केअर सुविधा   

पुणे : कर्करोग उपचारांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे रुग्ण-केंद्रित आणि कार्यक्षम आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या आहेत. याच अनुषंगाने जहांगीर हॉस्पिटलने ऑन्कोलॉजी डे केअर सेवा सुरू केली असून, त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात रात्री राहण्याची आवश्यकता न पडता विशेष उपचार मिळू शकतात.
 
या सुविधेअंतर्गत केमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि सपोर्टिव्ह केअर हे सर्व उपचार एका दिवसातच पूर्ण केले जातात. त्यामुळे रुग्ण दिवसभरात उपचार घेऊन संध्याकाळी घरी परतू शकतो. रुग्णांच्या सोयीसाठी युनिटमध्ये खाजगी व शांत वातावरण पुरवले जाते. उपचारादरम्यान गोपनीयता सुनिश्चित करण्यात आली आहे. प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी वेळ-केंद्रित प्रक्रिया अवलंबली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी तत्पर आहेत.जहांगीर हॉस्पिटलमधील ऑन्कोप्लास्टिक सर्जन व ऑन्को सायन्सचे संचालक डॉ. आनंद कोप्पिकर म्हणाले , आमच्या ऑन्कोलॉजी डे केअर युनिटमध्ये रुग्णांसाठी एका दिवसातच विविध उपचारांची सुविधा आहे. त्यामुळे त्यांना संध्याकाळी घरी परतण्याची मोकळीक मिळते. 
 

Related Articles