E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून, पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि उर्जा देणार्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, महंत रामगिरी महाराज, पुरुषोत्तम मोरे, माणिक मोरे, अक्षय महाराज भोसले तसेच वढू ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू संतांची, वीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देव देश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामे करताना पावित्र्य कमी होणार नाही. याची काळजी घ्यावी. दोनही स्थळांच्या राज्याच्या लौकिकाला साजेसा विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. अशीही त्यांनी ग्वाही दिली.
राज्य सरकार हे लोक कल्याणकारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे सरकार असून जन कल्याणाचा संकल्प सरकारने केला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या, तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले यांच्या विकासाला प्राधान्य दिले. गडकोट किल्ले आपले धरोहर आहेत. गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण काढले जाईल, गडकोट किल्ल्यांचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून शिंदे म्हणाले. मुंबईतील सागरी मार्गाला धर्मरक्षक संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी करण्यात आली, ही अभिमानाची बाब आहे.
वढू गाव हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहे. वढू हे स्वराज्य तीर्थ असून, या स्वराज्य तीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जायचे आहे. गो-मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गो-शाळेला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आवश्यकता असल्यास गो हत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी महंत रामगिरी व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपले विचार व्यक्त केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात धर्मरक्षणासाठी काम करणार्या व्यक्तींना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
Related
Articles
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत
27 Mar 2025
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
01 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत
27 Mar 2025
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
01 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत
27 Mar 2025
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
01 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत
27 Mar 2025
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत