व्हॉट्सऍप कट्टा   

वसंत ऋतू बावरा
 
पलटुनी आसमंत साजिरा
गोचर वसंत ऋतू बावरा !!
 
वृक्ष-वल्लरीतुनी हुंदडतो
हुंकार कोवळीक पालवतो
चैत्रगौरीचा भलता तोरा...
 
जाईजुई करी हितगुज कानी
मधुमालती आरक्त लाजुनी
वेड लावितो गंध मोगरा....
 
लावण्य शेवरी खुदकन हसे
सोनकिरण बहावा बरसे
हरेकाचा लडिवाळ नखरा...
 
आंबट-गोड खावी करवंदे
मधाळ जांभूळ तोठरे सौदे
काजुगराचा स्व-भाव न्यारा.....
 
केशर - रस भुरकूया चवीने
जीव तोषतो आम्रफळाने
गर्मी उकाडा पळेल सारा....
 
चाहूल राम जन्माची लागे
उत्सवाचे विणले धागे धागे
शुभसमयीचा पवित्र नारा...
 
गुढी उभारू संकल्पांची
नव संवत्सरीच्या आरंभाची
शुभसंदेश वाहती शब्दधारा...
- कविता मेहेंदळे,
मो : ९३२६६५७०२७
 

Related Articles