एटीएममधून पैसे काढणे १ मे पासून महागणार   

मुंबई : एटीएममधून पैसे काढणे आता १ मे पासून महागणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क शुक्रवारी २ रुपयांनी वाढवले आहे.  सध्या दरमहा पाच वेळा एटीएममधून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येतात. मात्र, त्यापुढील प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना २१ रुपये मोजावे लागतात. आता मोफत व्यवहाराची मर्यादा संपवल्यानंतर २१ रुपयांऐवजी २३ रुपये आकारले जाणार आहेत. हा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार आहे, असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. सध्या बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्लीमधील खातेधारक त्यांच्या बँक खात्याच्या एटीममधून महिन्याला पाचवेळा मोफत पैसे काढू शकतात. तर दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढू शकतात. 
 

Related Articles