रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल   

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे वक्तव्य 

कीव्ह : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा लवकरच मृत्यू होणार असून त्यांनतर दोन्ही देशांतील युद्ध देखील संपुष्टात येईल, असा वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले आहे. फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, पुतीन यांचा लवकरच मृत्यू होणार आहे. याबरोबरच दोन्ही देशातील युद्ध संपुष्टात येईल. झेलेन्स्की यांनी शांततेचा प्रस्ताव फेटाळून लावत रशियाने दोन देशांमधील संघर्ष लांबवल्याचा आरोप केला आहे. रशियाला हे युद्ध सुरू ठेवायचे आहे. ते पुढे ढकलत आहे. खरोखर हे युद्ध संपावे यासाठी आपण रशियावर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे, असेही झेलेन्स्की यावेळी म्हणाले.
 
गेल्या काही महिन्यांपासून पुतिन यांच्या आरोग्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आणि अफवा पसरताना पाहायला मिळत आहे. यातच पुतिन यांना सतत खोकला येत असल्याचे आणि त्यांचे हातपाय विनाकारण हालत असल्याचे चित्रफितीद्वारे समोर आल्याने या अफवांमध्ये आणखी भर पडली आहे.२०२२ मध्ये समोर आलेल्या एका चित्रफितीमध्ये माजी सरंक्षण मंत्री रर्गेई शोईगू यांच्याबरोबरच्या एका बैठकी दरम्यान पुतीन टेबलाला पकडून मान खाली घालून खुर्चीवर बसल्याचे दिसून आले होते. तसेच पुतिन यांना पार्किन्सन आजार झाल्याचे आणि ते कर्करोगाशी झुंज देत असल्याचा दावा देखील काही अहवालामध्ये करण्यात आला आहे. पण, या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. इतकेच नाही तर रशियन सरकारने हे दावे वेळोवेळी फेटाळून लावले आहेत.

Related Articles