पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू   

कराची : पाकिस्तानातील कराची येथील मालीर तुरुंगात एका ५२ वर्षांच्या भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. गौरव राम आनंद असे या मच्छिमाराचे नाव आहे. त्याने तुरुंगातील स्वच्छागृहात गळफास लावून घेतला, अशी माहिती तुरुंग अधीक्षक अर्शद हुसैन यांनी दिली.मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास कारागृहाच्या डॉक्टरांनी आनंद यास मृत घोषित केले. त्याचे पार्थिव ईधी ट्रस्टच्या शवागारात हलवण्यात आले आहे. शासकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल,  असेही त्यांनी सांगितले.
 
आनंद फेब्रुवारी २०२२ पासून मालीरच्या तुरुंगात बंद होता. सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानने त्यास अटक केली होती. भारत-पाकिस्तानकडून दरवर्षी अशा मच्छिमारांची सुटका केली जाते. भारताचे बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील असतात. ईधी फाऊंडेशन, अन्सार बर्नी वेल्फेअर ट्रस्ट आणि सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १९० भारतीय मच्छिमार अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. 

Related Articles