तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते   

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला आणखी २० ते ३० जागा मिळाल्या असत्या तर केंद्रात आपण सरकार स्थापन केले असते, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी येथे सांगितले.काँग्रेस मुख्यालयात काल पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत खर्गे बोलत होते. काँग्रेसची विचारधारा मजबूत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या. आणखी २०-३० जागा मिळाल्या असत्या तर केंद्रात आपण सरकार स्थापन करु शकलो असतो, असे खर्गे यावेळी म्हणाले. 
 
काँग्रेसची लढाई संसदेत आणि संसदेबाहेर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीस आपण ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेलो. त्यामुळे भाजपला २४० वर रोखू शकलो, असेही ते म्हणाले.या बैठकीस राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील ३३८ जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. सुमारे चार तास ही बैठक चालली, अशी माहिती पवन खेडा यांनी दिली. या बैठकीस लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, अजय माकन आदींनी मार्गदर्शन केले.

Related Articles