नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी गुरुवारी फेटाळून लावली. तसेच, गृहमंत्री शहा यांनी कोणताही हक्कभंग केला नाही, असे सांगितले. त्यासाठी, त्यांनी १९४८ च्या एका सरकारी प्रसिद्धीपत्रकाचा हवाला दिला. काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी शहा यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची सूचना दिली होती. शहा यांनी राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन केल्याचा आरोप रमेश यांनी केला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात पंतप्रधान मदत निधीची स्थापना करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात पीएम केअर्सची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या काळात या मदत निधीवर केवळ एक़ा कुटुंबाचे नियंत्रण होते, असे शहा यांनी म्हटले होते.
Fans
Followers