मुंबई, (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये २०२७ मध्ये भरणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला ’अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील निर्णय जारी केला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान असून दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक आहे. दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा, गंगागोदावरी उत्सव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरला येत असतात.
Fans
Followers