आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश   

पुणे : सामाजिक काम करत असताना शासनाचे सहकार्य मोलाचे असते. जर सत्ता असेल तरच सामान्य जनते पर्यंत शासकीय योजनाचा लाभ पोहचविण्यास सोपे जाते. यामुळे महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश करत आहे. यावरून  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आनंद गोयल यांनी पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश आनंद गोयल यांनी केला. 
 
आनंद गोयल म्हणाले,  अनेक वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करीत, एक शिवसैनिक ते उपशहरप्रमुख पदापर्यंत माझा प्रवास राहिला. या संपूर्ण  काला वधीत पक्षाकडून देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत राहिलो. पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच पुणे शहराकडे कायम दुर्लक्ष राहिले. यामुळे विकास कामे होऊ शकली नाही. तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचे कधीही कौतुक केले नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विकास कामांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश  केला. आता शहरात आणखी जोमाने काम करून शिवसेना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हटले.गोयल यांचा प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. वडगावशेरी येथील आनंद गोयल यांच्यासह पुणे शहरातील मोठी ताकद आहे.

Related Articles