पुणे : मुळा - मुठा नदीकाठ सुधार योजनेत (नदी पुनर्जीवन प्रकल्प) वृक्ष लागवड करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामाची मुदत पाच वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. सदर योजनेचे काम सुरू झाल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जात होता. योजनेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार आहे, असा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान विभागाने योजनेत वृक्ष लागवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. वृक्षांची लागवड करणे आणि पुढील पाच वर्षांसाठी वृक्षांचे संगोपन करण्याच्या कामाचा यात समावेश आहे. सदर निविदा प्रक्रियेत चार संस्थांनी भाग घेतला होता. त्यापैकी दोन संस्था पात्र ठरल्या आहेत. पुण्यातील ईश्वरी असोसिसएटस या संस्थेने पुर्वगणनपत्रकापेक्षा १६.२० टक्के कमी दराने निविदा भरल्याने त्यांना हे काम करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीकरीता ठेवण्यात आला आहे.
Fans
Followers