अ‍ॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ   

पुणे : अ‍ॅमेझॉनने आज महाराष्ट्र आणि पुण्यातील त्यांच्या होम, किचन, आऊटडोर्स बिजनेसमधील वार्षिक २५% (वर्ष-दर-वर्ष) वाढ घोषित केली आहे, ज्यामुळे राज्यातील नवीन ग्राहकांमध्ये सुमारे १५% वाढ झाली आहे. या क्षेत्रात स्मार्ट होम, फिटनेस, सिक्युरिटी, किचन अप्लायंसेस आणि गार्डनिंग श्रेणीतील उत्पादनांना मोठी मागणी दिसून आली. महाराष्ट्रात, रॅकेट खेळांच्या मागणीत वाढ झाली आहे, बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटच्या विक्रीत अनुक्रमे १४०% आणि ११५% वार्षिक वाढ झाली आहे. दरम्यान, या क्षेत्रात क्रिकेट स्थानिक पसंतीचे ठरले असून क्रिकेट बॅटच्या विक्रीत वार्षिक ५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. पुण्यात झालेल्या दिवसभर चालणार्‍या या इव्हेंटमध्ये फर्निचर, घरगुती वापराच्या वस्तू, किचन आणि अप्लायंसेस, होम डेकोर आणि लाइटिंग, स्पोर्ट्स आणि फिटनेस, इलेक्ट्रिक व्हेइकल्स, ऑटो अ‍ॅक्सेसरीज, आउटडोर्स आणि गार्डनिंग आणि यांसारख्या बर्‍याच उत्पादनांचा समावेश होता. 
 
या अद्वितीय प्रदर्शनामुळे मीडिया आणि भागीदारांना ऍमेझॉन इंडियाच्या नेतृत्वाशी संवाद साधताना टॉप ब्रँड आणि उत्पादने अनुभवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात ऍमेझॉनच्या इंटरेस्टिंग किचन फाइंड्स स्टोअरफ्रंटची सुद्धा सुरुवात झाली, जे होम आणि किचन श्रेणीतील अद्वितीय आणि नावीन्यपूर्ण उत्पादने असलेले एक खास तयार केलेले ठिकाण आहे. ऍमेझॉन इंडियाच्या किचन आणि आऊटडोर्सचे संचालक के. एन. श्रीनाथ म्हणाले, पुण्यात ऍमेझॉन होम अँड किचन एक्सपिरिएन्स ऍरेना २.० ची सुरुवात करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. होम, किचन आणि आऊटडोर्स ऑनलाइन शॉपिंगकडे अधिकाधिक ग्राहक वळत असल्याने, आम्ही निरोगी, स्वच्छ आणि अधिक सोयीस्कर जीवनशैलीकडे एक मजबूत वळण म्हणून बघत आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र आणि पुण्यात वार्षिक दुहेरी अंकी वाढ होत आहे.Amazon.in वर, आम्ही उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांची विस्तृत निवड आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतींना पूर्ण करणार्‍या उत्तम डील देऊन खरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Related Articles