जल सुरक्षा सुनिश्चित करण्यात हायड्रॉलिक संरचना महत्त्वाची : वर्मा   

पुणे : जल सुरक्षा सुनिश्चित करण्यात हायड्रॉलिक संरचना महत्त्वाची भूमिका बजावतात. मॉडेलिंग तंत्रांचा वापर करून जल सुरक्षेसाठी अधिक कार्यक्षम प्रणाली डिझाइन करण्यास मदत होते, असे मत सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनचे (सीडब्ल्यूपीआरएस) एम. के. वर्मा, शास्त्रज्ञ, डी यांनी व्यक्त केले.जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आयसीआय आणि फोटोग्राफी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिनानिमत्त मॉडेलिंग तंत्रांद्वारे जल संरचना आणि महत्त्वपूर्ण कामगिरी या विषयावर तज्ज्ञ सत्रात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. यावेळी रायसोनी महाविद्यालयाचे पुणे येथील कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. एस. जी. बान आणि डॉ. ए. जी. डहाके आदी उपस्थित होते.  
 
एम. के. वर्मा शास्त्रज्ञ, डी म्हणाले, जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील तरुण अभियंत्यांनी पाणी व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या समस्यांना तोंड देण्यामध्ये दाखवलेला उत्साह पाहून आनंद होतो. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आणि या क्षेत्रातील शाश्वत विकासात योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जलसंपत्ती व्यवस्थापनातील आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रगत मॉडेलिंग तंत्रांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करून हायड्रॉलिक संरचनांवरील त्यांचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. विशेषतः हवामान बदल आणि वाढत्या पाण्याच्या कमतरतेला तोंड देताना जलसंपत्तींचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील शाश्वत पद्धतींचा प्रसार व्हावा.
 
रायसोनी महाविद्यालयाचे पुणे येथील कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी सांगितले की, जागतिक जल दिन या मौल्यवान संसाधनाचे रक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देतो. श्री. एम. के. वर्मा यांनी आमच्या विद्यार्थ्यांना हायड्रॉलिक संरचना आणि मॉडेलिंग तंत्रांबद्दल अमूल्य अंतर्दृष्टी प्रदान केली, ज्यामुळे त्यांना पाणी व्यवस्थापनातील वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान मिळाले.अध्यक्ष सुनील रायसोनी आणि कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी विद्यार्थी व सिव्हिल इंजीनिअरिंग विभागाचे अभिनंदन केले.

Related Articles