राज्यात मे महिन्यात शिक्षक अभियोग्यता परीक्षा   

सोलापूर,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आयोजित करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टीएआयटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते.
राज्यातील शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात. सन २०१७ नंतर २०२२ साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात टीएआयटी परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे.

Related Articles