विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य   

पुणे : विद्यापीठाच्या आवारात पायी जाणार्‍या तीन विद्यार्थीनींकडे पाहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी, विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर देखील त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनसमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन याप्रकरणी कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवना समोर असलेल्या खानावळीतून जेवण करून तीन विद्यार्थीनी वसतीगृहाकडे जात होत्या. त्यावेळी, मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी, दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली तर, एकीने तातडीने आंबेडकर भवनजवळील सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली. परंतु नंतर तो व्यक्ती पळून गेला.
 
दरम्यान, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थिनींनी तक्रार केली. मात्र, त्यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे उत्तर  दिले आणि यासंदर्भात तुम्ही कुलगुरूंना भेटा असे सांगितले. त्यानंतर, विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या. 

Related Articles