E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शेतातील कामासाठी आळंदीतून पाच मजुरांचे अपहरण
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
पिंपरी
: शेतातील कामे करण्यासाठी आळंदीतून पाच कामगारांचे अपहरण करण्यात आले. कामगारांना कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे शेतातील खोलीत दहा दिवस डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतली. आळंदी पोलिसांनी पाचही कामगारांची सुटका केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ते २५ मार्च या कालावधीत घडली.
या प्रकरणी नितीन भाऊसाहेब निंबाळकर (वय-३८), गणेश भाऊसाहेब निंबाळकर (वय-३५), भाऊसाहेब निंबाळकर (वय-५०, तिघे रा. दूरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोहन मारुती वगरे (वय-३०, आळंदी) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोहन वगरे, देवानंद सुभाष लांबटोंगळे (रा. यवतमाळ), पप्पू गणेशराव मगर (रा. हिंगोली), मुकुलकुमार डिसुझा (रा. उत्तर प्रदेश), श्रीराम बेंद्रे (रा. परभणी) हे कामाच्या शोधात आळंदी येथे आले होते. मागील काही महिन्यांपासून ते सर्वजण आळंदी येथे राहात होते.
१४ मार्च रोजी आरोपी एका मोटारीतून आले. पाचही कामगार आळंदी येथील नगरपरिषद चौकात कामाच्या शोधात थांबले होते. आरोपींनी या कामगारांना काम असल्याचे सांगून मोटारीत बसवले. त्यानंतर पाचही कामगारांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे नेले. तिथे एका शेतातील खोलीत डांबून ठेवले. दिवसभर कामगारांकडून काम करून घेतले जात होते आणि रात्री डांबून ठेवले जात होते. त्यांच्या कामाचा कोणताही मोबदला दिला जात नव्हता.
दरम्यान, मोहन वगरे यांनी पत्नी आजारी असल्याने तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आरोपींकडे फोन मागितला. त्यावेळी मोहन यांना पत्नी जास्त आजारी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी गावी जाण्याची मागणी केली. मोहन पत्नीला पाहण्यासाठी आळंदीत आले असता त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ कर्जत येथे धाव घेत कामगारांची सुटका केली. आरोपींचा शोध सुरू आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
29 Mar 2025
केंद्रीय करारात बीसीसीआयकडून अक्षरला बढती
27 Mar 2025
अत्याधुनिक तेजस विमानांसाठी अमेरिकेकडून इंजिनाचा पुरवठा
26 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्मृती मानधना ’अ’ श्रेणीत
26 Mar 2025
स्वामीनामाच्या जयघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली
01 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
5
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार