चेन्नईला आज बंगळुरुचे आव्हान   

चेन्नई : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात उद्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आणि बंगळुरु हे दोन्ही संघ बलाढ्य असल्यानं कोण विजय होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्याच लढतीत गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे.तर, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जनं देखील मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. चेन्नईला चेपॉकवर पराभूत करणं आरसीबीसाठी तितकं सोपं असणार नाही. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसन यानं आरसीबीला उद्याच्या मॅच संदर्भात सल्ला दिला आहे.
 
शेन वॉटसन हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग राहिला आहे. वॉटसन विराट कोहली आणि एमएस धोनीसोबत खेळला आहे. चेपॉकवर खेळणं कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असतं, असं वॉटसन म्हणाला.  शेन वॉटसन यानं जिओस्टारवर बोलताना म्हटलं की ज्या प्रकारे चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज आहेत त्यानुसार आरसीबीसमोर कठोर आव्हान असेल. चेन्न्ई विरुद्ध विजय मिळवायचा असेल तर आरसीबीला त्यांच्या संघाच्या रचनेत बदल करावा लागेल. यामध्ये चूक होऊ नये. चेपॉक हा बालेकिल्ला आहे, असं वॉटसन म्हणाला. 
 
वॉटसनच्या मतानुसार चेन्नईचा चेपॉकवर दबदबा राहिला आहे, त्याचं मुख्य कारण त्यांच्याकडे असणारे फिरकीपटू हे आहे. होम ग्राऊंडवर चांगली कामगिरी करावी अशा पद्धतीनं चेन्नईच्या टीमची रचना करण्यात आली आहे.रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि नूर अहमद यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ते चेन्नईसाठी या फायदेशीर ठरेल. नूरनं ज्याप्रकारे पहिल्या मॅचमध्ये कामगिरी केली आहे त्यामुळं चेन्नईचं मनोबल वाढलं आहे. चेन्नईला माहिती आहे आता त्यांच्याकडे बळी काढण्यासाठी एक पर्याय आहे, असं शेन वॉटसन म्हणाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध नूर अहमदनं ४ ओव्हरमध्ये ४ विकेट घेत १८ धावा दिल्या होत्या. त्या मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईला ४ विकेटनं पराभूत केलं होतं. दुसरीकडे आरसीबीनं देखील गतविजेत्या केकेआरला ७ बळीने पराभूत केले होते. 

Related Articles