सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू   

२० जणांची प्रकृती चिंताजनक

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील लखनौमदील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.  मंगळवारी संध्याकाळी या केंद्रामध्ये राहणाऱ्या सुमारे २० मुले अचानक आजारी पडली. त्यानंतर या मुलांना लोकबंधू रुग्णालयात नेण्यात आले.
 
लोकबंधू राज नारायण संयुक्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकक्षक डॉ. राजीव कुमार दीक्षित यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मंगळवारी संध्याकाली पुनर्वसन केंद्रातील सुमारे २० मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं. ही सर्व मुलं मानसिक दृष्ट्या अपंग आहेत. जेव्हा या मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती.
 
या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. लखनौच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या अन्नविषबाधेमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. तपासासाठी पुनर्वसन केंद्रामधून जेवणाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या तपासासाठी नगर निगम आणि अन्न विभागाच्या पथकालाही तैनात केले आहे. एवढंच नाही तर केंद्राने या घटनेची माहिती योग्य वेळी रुग्णालयाला का दिली नाही, याचाही तपास होणार आहे.  
 

Related Articles