दक्षिण कोरियातील वणव्यात १६ ठार, १९ जखमी   

सेऊल : दक्षिण कोरियात जंगलाला भीषण आग लागली. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला असून १९ जखमी झाले. देशाच्या दक्षिणेच्या भागात आग लागली होती. 
वादळी वारे आणि कोरड्या हवामानामुळे आग भडकली. अनेक शहरे आणि गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सुमारे ४३ हजार एकरवरील जंगलाचे नुकसान झाले आहे. मालमत्तेची हानी झाली असून त्यात १ हजार ३०० वर्षांपूर्वीच्या बौद्ध मंदिराचा समावेश आहे. अग्निशमन दलाने  अँडोग शहरातील सुमारे ५ हजार ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. उल्सान शहराच्या उसीआँग आणि सॅचोंग भागांतही आग पसरली. तेथे मोठी आग धगधगत होती, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या गृहमंत्रालयाने दिली. जंगली भागातील आग नियंत्रणात आणली असून शुष्क आणि वार्‍यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे आले. ती आणखी पसरली. सुमारे ९ हजार जवानांसह १३० हॅलिकॉप्टर्स मदतकार्यात गुंतले आहेत. शेकडो वाहने नष्ट झाली आहेत. 
 
वादळी वार्‍यामुळे रात्री मदतकार्य थांबविले होते. उसोंग ग्रामीण भागातील विविध गावांतील रहिवाशांना प्रदेश सोडण्याचे आदेश दिले. त्यांची तात्पुरती व्यवस्था अँडोग विद्यापीठात केले आहे. त्यामध्ये अनेक शाळा आणि इनडोअर खेळांच्या संकुलाचा समावेश आहे.  

Related Articles