अमेरिकेच्या आरोग्य संचालकपदी भट्टाचार्य   

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक डॉ. जय भट्टाचार्य यांची नियुक्ती झाली आहे. सिनेटने त्यांची नियुक्ती केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
 
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आरोग्य विषयक धोरणाचे भट्टाचार्य प्राध्यापक आहेत. मंगळवारी त्यांच्या नियुक्तीसाठी सिनेटमध्ये मतदान झाले. त्यांच्या बाजूने ५३ तर विरोधात ४७ मते पडली. दरम्यान, गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी शिफारस केली होती. ते रॉबर्ट केनेडी यांच्या नेशन मेडिकल रिसर्च संस्थेशी संलग्न आहेत. नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन मौलिक ठरले आहे. त्याची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. त्यामुळे त्यांची नियक्ती  आरोग्य संस्थेवर करण्यात आली आहे. 

Related Articles